नाशिक : शाईचा तुटवडा, नाशिक करन्सी नोट प्रेसमध्ये छपाई बंद
Continues below advertisement
देशातील दहा राज्यांमध्ये चलन तुटवडा निर्माण झाला असतानाच नाशिकमधून चिंता वाढवणारी बातमी आहे. नाशिक करन्सी नोट प्रेसमध्ये 20, 100, 200 आणि 500 च्या नोटांची छपाई जवळपास बंद आहे. त्यामुळे याचा मोठा परिणाम जाणवण्याची शक्यता आहे.
केंद्र सरकारने 20 आणि 100 च्या नोटांचं नवीन डिझाईन मंजूर न केल्याने नोटांची छपाई थांबली आहे, तर 200 आणि 500 च्या नोटांच्या छपाईसाठी लागणाऱ्या शाईचा तुटवडा असल्याने नोटांच्या छपाईवर त्याचा परिणाम झाला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
दरम्यान, मार्चपर्यंतच्या स्टॉकची छपाई पूर्ण झालेली आहे, मात्र एप्रिलपासूनची ऑर्डर न आल्याने पुढील छपाई बंद आहे, असंही काहींचं म्हणणं आहे. त्यामुळे सरकारी दिरंगाईचा परिणाम स्वाभाविकपणे नोटांच्या छपाईवर झाला आहे. तर ही छपाई बंद होणे आणि सध्याचा चलन तुटवडा यांचा संबंध नसल्याचा दावाही केला जात आहे.