नाशिक : महापालिकेत देवांचे फोटो लावण्यास बंदी, तुकाराम मुंढेंचा निर्णय

Continues below advertisement
नाशिक महानगर पालिकेचा कारभार हाती घेतल्यानंतर आयुक्त तुकाराम मुंढे यांनी महापालिकेत देवबंदी केलीय. महापालिकेच्या विविध कक्षात, कर्मचार्यांच्या टेबलवर, भिंतीवर लावण्यात आलेले देवदेवतांचे फोटो काढण्याच्या सूचना मुंढेंनी केल्यात. त्यानंतर देवदेवतांचे फोटो हटविण्यात आलेत. देवांचे फोटे काढण्याच्या सूचना करत आचार आणि विचारांची साफसफाई झाली पाहिजे. अशी प्रतिक्रिया मुंढेनी दिलीय.  त्याच बरोबर महापालिकेतील इतर अधिकाऱ्यांनी माध्यमांशी बोलू नये. असा फतवा मुंढेंनी काढलाय. एकीकडे पारदर्शकतेचा पुरस्कार करयाचा आणि दुसरीकडे कामकाजाची माहिती माध्यमांना देवू नये अशी अधिकार्याना तंबी द्यायची. यामुळे प्रसिद्धीचा झोत मुंढेंनी स्वतावरच ठेवल्याची चर्चा महापालिकेत सुरु आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram