नाशिक : लग्नाच्या दिवशीच नाशकातील उपसरपंचावर अविश्वास ठराव

Continues below advertisement

नाशकातील एका उपसरपंचासमोर गावकीतल्या राजकारणामुळे मोठा पेचप्रसंग निर्माण झाला आहे. अविश्वास ठरावामुळे लग्नाच्या दिवशीच विलास जोशी कात्रीत सापडले आहेत. नाशिकच्या इगतपुरी तालुक्यातील कुर्णोली गावच्या उपसरपंचांसमोर पेच प्रसंग उभा राहिला आहे. विलास जोशी या तरुण उपसरपंचावर त्यांच्याच सहकाऱ्यांनी अविश्वास ठराव आणला. त्यावर मतदान घेण्यासाठी 12 मार्चला विशेष सभा बोलवण्यात आली. त्याच दिवशी जोशी यांचं लग्न आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram