नाशिक : महापालिकेने पोलीस प्रशासनाचे 24 लाख रुपये थकवले

Continues below advertisement
नाशिक महानगर पालिकेने पोलीस प्रशासनाचे तब्बल २४ लाख ३८ हजार रुपये थकीत ठेवलेत.  महापालिकेकडून शहरात अतिक्रमण विरोधी मोहीम राबविली जाते. त्यासाठी पोलीस बंदोबस्त दिला जातो. सध्या पोलिस प्रशासनाकडून १ अधिकारी आणि १३ कर्मचारी असा बंदोबस्त आहे. त्या बंदोबस्ताचे गेल्या एक दीड वर्षापासुनचे पैसे महापालिकेनं थकविलेत. वारंवार  स्मरण पत्र देवूनही थकीत मिळत नसल्याची पोलिसांची नाराजी आहे. दरम्यान ही थकबाकी आपण येण्याच्या आधीपासूनची असल्याचा खुलासा आयुक्त तुकाराम मुंढेनी केलाय. तसंच येत्या दोन तीन दिवसात थकबाकी अदा केली जाईल असं स्पष्ट केलंय. ५० लाख रुपयांपैकी निम्मी रक्कम भरलीय उर्वरित बाकी असल्याचा खुलासा पोलिसाकडून केला जातोय, मात्र वाद नको म्हणून पोलीस प्रशासन याबाबत बोलायला तयार नाही. 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram