नाशिक : निवृत्तीनाथांच्या पालखी सोहळ्याच्या स्वागतावरुन वाद

Continues below advertisement
नाशिकमध्ये संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यांच्या पालखी सोहळ्याच्या स्वागतावरुन नवा वाद उफाळून आलाय. नाशिक महापालिका प्रशासनाने विरोध केल्यान परंपरा खंडीत होते कि काय असा प्रश्न उपस्थित होतोय. आषाढी एकादशीनिमित्त त्रंबकेश्वरहून निवृतीनाथ महाराजांची पालखी गेल्या अनेक वर्षापासून पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ होते. दरवर्षी पालखीचे नाशिक नगरीत महापालिकेच्या वतीने स्वागत केले जाते. हा मान प्रथम नागरिक असणाऱ्या महापौरांना दिला जातो. मात्र यंदा महापालिका प्रशासनाने त्यात खोडा घातलाय. शासनाच्या निर्णयानुसार धार्मिक सण उत्सवांना खर्च करता येत नसल्याचा दावा मनपा प्रशासनाने केलाय. त्यामुळे वारकऱ्यांमध्ये नाराजी परसली असून येत्या काळात यावरुन मोठा वाद होण्याची चिन्ह आहेत.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram