Shardiya Navratri 2019 | सप्तश्रृंगी देवीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी | ABP Majha
Continues below advertisement
नाशिकमधील वणीच्या सप्तश्रृंगी गडावरही नवरात्रोत्सवाचा उत्साह दिसून येतोय. सकाळी साडेसहाच्या सुमारास देवीच्या अलंकारांची विधीवत पूजा करण्यात आली. यात कोहिरी हार, पुतळ्याच गाठलं, मोहन माळ, मंगळसूत्र, वज्रटिप, मुकुट, तोड़े कमरपट्टा आणि पाऊल अशा एकूण 12 किलो सोन्या-चांदीच्या दागिन्यांचा समावेश होता. यानंतर गड चढत मंदिरात वाजत गाजत अलंकाराची मिरवणूक काढण्यात आली. सकाळी सात वाजता देवीला अभिषेक करण्यात येऊन महापूजा पार पडली आणि घटस्थापना करण्यात आली.
Continues below advertisement