नाशिक : अखेर नाशिक-दिल्ली 'उडान' सेवा सुरु
उडान योजनेअंतर्गत नाशिक-दिल्ली विमानसेवा आजपासून सुरु झाली आहे. जेट एअरवेजचे वरिष्ठ उपाध्यक्ष राज शिवकुमार यांच्या हस्ते नाशिक-दिल्ली उडान सेवेचं उद्घाटन करण्यात आलं. सोमवार, बुधवार, शुक्रवार असे आठवड्यातून तीन दिवस ही सेवा सुरु असणार आहे. या सेवेमुळे नाशिक-दिल्ली अंतर आता अवघ्या 2 तासात गाठता येणार आहे. 2800 ते 3100 रूपयांपर्यंत या विमानसेवेचे दर असणार आहेत. नाशिक एअरपोर्टवरुन पहिल्यांदाच बोईंग विमानाद्वारे सेवा उपलब्ध होत असून जेट एअरवेजचे बोईंग ७३७ या विमानाद्वारे दिल्लीसाठी सेवा मिळणार आहे.