नाशिक : पेशवेकालीन नारायण मंदिराचं लवकरच नुतनीकरण
Continues below advertisement
नाशिक शहरातील पेशवेकालीन नारायण मंदिराला पुन्हा एकदा गतवैभव प्राप्त होणार आहे. पुरातत्व विभागाकडून मंदिराच्या जीर्णोद्धारचं काम हाती घेण्यात आलं आहे. मंदिराच्या नुतनीकरणासाठी साडे बारा कोटी रूपये खर्च केला जाणार आहे. मंदिरावरचे धोकादायक दगड उतरविण्याच काम गेल्या काही दिवसापासून सुरु होतं. त्यासाठी क्रेन आणि मालवाहू ट्रकची मदत घेतली जात होती. त्या गाड्यांच्या बॅटरी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्यान काम ठप्प झालं होतं. मात्र आता पुन्हा हे काम हाती घेण्यात आलंय. दरम्यान मंदिर परिसरात सीसीटीव्ही कँमेरे बसवावे अशी मागणी स्थानिकांकडून होतेय.
Continues below advertisement