नाशिक : तुकाराम मुंढे वादात, करवाढीविरोधात विविध संघटनांकडून 'मी नाशिककर' मोहीम सुरु
Continues below advertisement
नाशिक महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढेंनी सूत्र हाती घेतल्यानंतर ते वादात सापडले आहेत. आधी लोकप्रतिनिधींचा विरोध आणि आता सामान्य नाशिककरही मुंढेंच्या विरोधात उभं टाकत आहेत. नाशिक महापालिकेनं घरपट्टीत मोठ्या प्रमाणावर वाढ केली आहे. त्याविरोधात मी नाशिककर मोहीम सुरु केली आहे. मी नाशिककर झेंड्या खाली विविध क्षेत्रातील संघटनाना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला जातो आहे.
Continues below advertisement