नाशिक : सहा दिवसांपासून बेपत्ता असलेले मनपा सहाय्यक अभियंता रवींद्र पाटील घरी परतले

Continues below advertisement
नाशिक महापालिकेच्या नगररचना विभागातील बेपत्ता सहाय्यक अभियंता रवींद्र पाटील हे आज सकाळी घरी परतले आहेत. महापालिकेतील अती कामाचा त्रास होत असल्याने आत्महत्या करत असल्याची चिठ्ठी लिहून ते गेल्या सहा दिवसांपासून बेपत्ता होते. मात्र आज पहाटे ते घरी परतले.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram