नाशिक : सहाय्यक अभियंता रवींद्र चार दिवसांनंतरही बेपत्ता, महापौर कुटुंबीयांच्या भेटीला
Continues below advertisement
नाशिकच्या महापौर रंजना भानसी आणि स्थायी समिती सभापती हिमगौरी आडके यांनी आज, गेल्या 4 दिवसांपासून बेपत्ता असलेले नाशिक पालिकेचे सहाय्यक अभियंता रवींद्र पाटील यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी रवींद्र पाटील यांच्या पत्नी शीतल यांनी महापौरांपुढे आपली कैफियत मांडली. महापालिकेत नवीन आयुक्त रुजू झाल्यापासून रवींद्र यांच्यावर कामाचा ताण वाढल्याचा आरोप शीतल पाटील यांनी केला. आज रवींद्र यांच्या मुलीचा निकाल आहे, आज तरी रवींद्र यांनी कुटुंबीयांना फोन करावा अशी आर्त साद त्यांच्या पत्नीने घातली आहे.
Continues below advertisement