नाशिक : प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात तिरंगा हातात घेऊन अश्लील नृत्य, नर्तकींवर पैसेही उधळले
नाशिकमध्ये २६ जानेवारी निमित्त आयोजित केलेल्या भोजपुरी कार्यक्रमात देशभक्तीपर गाण्यांवर चक्क अश्लील नृत्याचा कार्यक्रम पार पडला असून यामुळे सर्व स्तरातून संताप व्यक्त करण्यात येतो आहे. सिडको परिसरातील कामठवाड़ा येथे असलेल्या माऊली लॉन्स मध्ये शुक्रवारी हा कार्यक्रम पार पडला आणि विशेष म्हणजे या कार्यक्रमाला प्रमुख म्हणून सत्ताधारी भाजप पक्षाचे शिक्षक आमदार आणि स्वतःला डॉकटर म्हणवून घेणारे आमदार डॉक्टर अपूर्व हिरे हे उपस्थित होते.