नाशिक : सिन्नर तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यात दुचाकीस्वार जखमी
Continues below advertisement
सिन्नर तालुक्यातील मेंढी गावाजवळ बिबट्यानं केलेल्या हल्ल्यात तरूण जखमी झाला. रमेश घुमरे असं जखमी तरूणाचं नाव आहे. सिन्नरमधून मित्राला भेटून दुचाकीवरून परतत असताना रस्त्यावर अचानक 3 बिबट्या आडवे आले. त्यातील एका बिबट्यानं दुचाकीच्या दिशेनं धाव घेतली. आणि रमेश यांच्यावर हल्ला चढवला. दरम्यान रमेश आणि त्याच्या मित्रानं आरडाओरडा केल्यानं बिबट्या बाजूच्या शेतात पसार झाले.
गेल्या 2 - 3 महिन्यांपासून या भागांत बिबट्या दुचाकीस्वारांवर हल्ले करण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. वनविभागानं तातडीनं प्रतिबंधक उपायययोजना करण्याची मागणी परिसरातून करण्यात येत आहे.