VIDEO | अनोखा प्रचार, नाशकातून आईस्क्रीम विक्रेता आणि लॉन्ड्री व्यावसायिक लोकसभेच्या रिंगणात | एबीपी माझा
नाशिक लोकसभा मतदारसंघात आईस्क्रीम विक्रेता आणि लॉन्ड्री व्यावसायिक निवडणुकीच्या रिंगणात आहेत. प्रचाराचा शेवटचा दिवस असल्यानं दोन्हीही उमेदवार मतदारांना आवाहन करण्यासाठी रस्त्यावर उतरलेत. आईस्क्रीम दुकानचालक विलास देसले यांची निशाणी आईस्क्रीम आहे. ते दुकानात आईस्क्रीम खरेदी करायला येणाऱ्या ग्राहकांना मतदानाचं आवाहन करत आहेत. तर, 10 बाय 10 च्या घरात राहून लॉन्ड्रीचा व्यवसाय करणारे प्रकाश कनोजे दुचाकीवर फिरुन एकटेच प्रचार करतायत.