नाशिक : महापालिकेत विरोधकांचा गोंधळ, राजदंड पळवण्याचाही प्रयत्न
नाशिक महापालिकेच्या महासभेत विरोधी नगरसेवकांनी तुफान गोंधळ घातला. विरोधी नगरसेवकांच्या प्रभागातील कामांत पक्षपातीपणा होत असल्याचा आरोप करत राजदंडही पळवण्याचा प्रयत्न झाला. तुफान गोंधळामुळे राष्ट्रगीताला सुरुवात करुन महापौरांनी सभा आवरती घेतली. गोंधळानंतर भाजप वगळता इतर सर्व पक्षाचे नगरसेवक आयुक्त तुकाराम मुंडेंच्या भेटीला गेले आहेत. यावेळी महापालिकेत महिलांवर अन्याय केला जात असल्याचा आरोपही शिवसेना नगरसेविकांनी केलाय