नाशिक : कवी प्रकाश होळकर यांच्या 'कोरडे नक्षत्र'च्या बनावट प्रती
Continues below advertisement
सुप्रसिद्ध कवी प्रकाश होळकर यांच्या कोरडे नक्षत्र या काव्य संग्रहाच्या बनावट प्रती छापून, त्या वितरीत केल्याच्या धक्कादायक प्रकार नाशिकमध्ये उजेडात आलाय. याप्रकरणी सातपूर पोलिस ठाण्यात कॉपीराईट कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पॉप्यूलर प्रकाशनने हे पुस्तक १९९७ ला छापले, २००५ साली त्याचं पुनर्मुद्रण करण्यात आलं. मात्र, सविता पन्हाळे या महिलेने कुठलिही परवानगी न घेता २ हजार प्रती छापल्या आणि त्या लोकांना भेट म्हणून देत असल्याची तक्रार होळकरांनी केली आहे. तसंच संबंधित महिला अनेक वर्षांपासून मानसिक त्रास देत असल्याचही तक्रारीत नमूद करण्यात आलं आहे. होळकर यांचा कोरडे नक्षत्र हा काव्यसंग्रह चांगलाच गाजला. यातील कवितांचा विद्यापीठातील अभ्यासक्रमातही समावेश आहे.
Continues below advertisement