नाशिक | दिंडोरी तालूक्यातील करंजवण धरण शंभर टेक्के भरलं
नाशिक जिल्ह्यातल्या करंजवण धरण शंभर टक्के भरल्यामुळे धरणातून विसर्ग सुरु करण्यात आला आहे. दिंडोरी तालूक्यातील करंजवण,ओझरखेड या धरणक्षेत्रात गेल्या दोन दिवसांपासून जोरदार पाऊस होतोय. करंजवण हे दिंडोरी तालुक्यातील सर्वात मोठं धरण म्हणून ओळखलं जातं. कादवा नदीत 2000 क्युसेक इतका विसर्ग सुरु करण्यात आला आहे.या धरणातील पाणी येवला, मनमाड शहराला पाणी पुरवठा करणा-या पालखेड धरणात येतं. त्यानंतर पुढे कालव्याद्रवारे ते मनमाड, येवला शहराला पाणी पुरवठा करणा-या साठवण तलावात आणलं जातं.