नाशिक : स्मार्ट सिटीअंतर्गत कालिदास कलामंदिराचा कायापालट
Continues below advertisement
नाशिकच्या सांस्कृतिक क्षेत्राचा साक्षीदार असणारे कालिदास कला मंदिर नुतनिकरणानंतर नव्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला येतं आहे. स्मार्ट सिटीअंतर्गत 9 कोटी 66 लाख रुपये खर्चून कालिदास नाट्यगृहाचा कायापालट करण्यात आला आहे. अत्याधुनिक साऊंड सिस्टिम, रंगमंचावरची आकर्षक प्रकाशयोजना आणि आरामदायी आसनव्यवस्था अशा सुविधा तयार करण्यात आल्या आहेत. गेल्या काही वर्षात कालिदास नाट्यमंदिराची दूरवस्था झाली होती. नाट्य अभिनेते प्रशांत दामले यांच्यासह अनेक कलावंतांनी कालिदासच्या दुरवस्थेबद्दल नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर आता मागच्या एका वर्षात अत्याधुनिक सोयिसुविधांनी कालिदास कला मंदिराला सुसज्ज करण्यात आलं आहे
Continues below advertisement