नाशिक : जनार्दन स्वामींच्या आश्रमातील समाधींवरुन नवा वाद
Continues below advertisement
त्र्यंबकेश्वरमधल्या जनार्दन स्वामींच्या आश्रमात बांधण्यात आलेल्या 3 समाधीवरुन नवा वाद निर्माण झालाय...शांतीगिरी महाराजांच्या सांगण्यावरुन मृतदेह संशयास्पदरित्या पुरण्यात आल्याचा आरोप स्थानिक भक्तांनी केलाय....जनार्दन स्वामींचा उत्तराधिकारी म्हणून सध्या शांतीगिरी महाराज जबाबदारी सांभाळतायत...2011 मध्ये आनंद गिरी महाराज आणि 2017 मध्ये स्वामी वामदेवगिरी महाराज यांचे मृतदेह पुरुन समाधी बांधण्यात आली...वामदेव यांचा मृतदेह पुरण्यापुरवी भक्तांना कल्पना देण्यात आली होती...मात्र भक्तांनी मृतदेह पुरण्यास नकार दिला तरीही विरोध झुगारुन मृतदेह पुरण्यात आला...त्यामुळे वेरुळच्या आश्रमातील संताची समाधी त्र्यंबेश्वरमध्ये करण्याचं कारण काय असा सवाल भक्तांनी उपस्थित केलाय...तसंच 2003 मध्येही बांधण्यात आलेल्या समाधीवरुन संशयाचं धुकं निर्माण झालंय...त्यामुळे संशयाच्या जाळ्यात अडकलेल्या शांतीगिरी महाराजांची चौकशी करण्याची मागणी स्थानिक भक्त करत आहेत.
Continues below advertisement