
नाशिक : ग्रामीण भागात मुसळधार पावसाचा फटका, शेडनेट जमीनदोस्त
Continues below advertisement
नाशिकच्या ग्रामीण भागात मान्सूनपूर्व पावसाचा जोरदार तडाखा बसला आहे. येवला, सिन्नर भागात वादळीवाऱ्यासह झालेल्या मुसळधार पासवसाने कोट्यवधी रुपयांचं नुकसान झालं आहे. शेतकऱ्यांनी लाखो रुपये खर्च करुन उभारलेले शेडनेट जमीनदोस्त झाले आहेत. शेडनेटमधील रोपवाटिका, शिमला मिरचीच्या पिकांचं मोठ्याप्रमाणात नुकसान झालं आहे. तर सिन्नर तालुक्यातील पांढुर्ली गावात घरांवरचे पत्रे उडून गेले आहेत. त्यामुळे अनेक कुटुंबांचा संसार उघड्यावर पडला आहे.
Continues below advertisement