नाशिक : लढाऊ सुखोई विमान शेतात कोसळलं, पॅराशूटने जवान खाली उतरले
Continues below advertisement
नाशिकमध्ये लष्कराचं सुखोई 30-210 हे विमान कोसळलं. पिंपळगाव बसवंत येथील वावी ठुशी गावाच्या शिवारात हे लढाऊ विमान अपघातग्रस्त झालं. या अपघातात संपूर्ण विमान जळून खाक झालं आहे. तांत्रिक बिघाड झाल्यानं विमान कोसळल्याचं सांगण्यात येत आहे. महत्त्वाचं म्हणजे या विमानातील तीन जण पॅराशूटने खाली उतरले. आज सकाळी अकराच्या सुमारास हा अपघात झाला.
Continues below advertisement