नाशिक : सावकाराच्या त्रासाला कंटाळून पती-पत्नीची राहत्या घरी आत्महत्या
पती आणि पत्नीनं राहत्या घरात आत्महत्या केल्याची घटना नाशिकमध्ये घडलीय. वासुदेव जाधव आणि संगीता जाधव असं या दाम्पत्याचं नाव आहे. सिडको परिसरातील या घटनेनं सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दुपारच्या सुमारास विषप्राशन केल्याचं शेजाऱ्यांच्या लक्षात आलं. त्यांनी तात्काळ पोलिसांना माहिती देत त्यांना उपचारासाठी नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात नेलं. मात्र उपचारादरम्यान त्य़ांचा मृत्यू झाला. कर्जबाजारीपणा आणि सावकाराकडून दिल्या जाणाऱ्या सततच्या धमक्यांना कंटाळून त्यांनी जीवन संपवल्याची माहिती आहे. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.