नाशिक : मद्यधुंद अवस्थेत पतीकडून पत्नीची हत्या, मुलांवरही हल्ला
Continues below advertisement
नाशिकच्या जेल रोड परिसरात पतीने पत्नीची हत्या करुन २ मुलांनाही गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे. अण्णासाहेब गायके असं या आरोपीचं नाव असून, तो आपल्या कुटुंबियांसह लरोड परिसरातील शिवरामनगरमध्ये राहत होता. बुधवारी संध्याकाळी त्याचा पत्नीसोबत वाद झाला. राग अनावर झाल्यानं त्यानं पत्नीच्या डोक्यात आणि छातीवर लोखंडी सळईने वार केले. यात पत्नीचा जागीच मृत्यू झाला. आईला वाचविण्यासाठी आलेल्या मुलांवरही त्याने वार केले. या हल्ल्यात मुलं जखमी झाले आहेत. याप्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपीला अटक करण्यात आली आहे.
Continues below advertisement