नाशिक : शहरातील इमारतींची कपाटकोंडी फुटली, रखडलेल्या बांधकामांचा मार्ग मोकळा

Continues below advertisement

नाशिक महानगरपालिका क्षेत्रातील इमारतींची कपाट कोंडी अखेर फुटलीये... आजच्या स्थायी समिती सभेत मार्ग काढण्यात आलाय. शहरातील साडे सहा आणि सात मीटर रुंद रस्त्यांचे ९ मीटर रुंदीकरण केले जाणार आहे. रुंदी करणासाठी रस्त्याच्या दुतर्फा असणर्या इमारतींची एक दीड मीटरची जागा महापालिका ताब्यात घेणार असून त्या वाढीव बांधकाम असणाऱ्या कपाटाना नियमित केलं जाणार आहे. इमारतींचे बांधकाम करताना आठ बाय चार फुटाचे बांधकाम बाहेर काढले जाते त्याला कपाट असे म्हणतात. बहुतेक इमारतीती कपाट न काढता त्या एवजी सरळ भिंत बांधून खोलीचे क्षेत्रफळ वाढविले जायचे. त्याचा बोजा ग्राहकाच्या डोक्यावर टाकून त्याकडून अधिक पैसे उकळले जात होते.  गेल्या १५ ते २० वर्षापासून नाशिकच्या बांधकाम क्षेत्रात ही प्रथा प्रचलित होती. मात्र नाशिक महापालिका आयुक्त पदाचा कार्यभार प्रवीण गेडाम यांनी स्वीकारल्यानंतर कपाटाच्या मुद्यावर कडक धोरण अवलंबल्याने इमारात पूर्णत्वाचे दाखले रखडले होते. हजारो ग्राहकांना घराचा ताबा मिळत नव्हता, बांधकाम परवानग्या दिल्या जात नव्हत्या, त्यामुळे दंड भरून बांधकामा नियमित करण्याची मागणी बांधकाम व्यवसायिकाकडून केली जात होती
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram