नाशिक : गंगापूर धरणातून पाण्याच विसर्ग, गोदाकाठच्या गावांना इशारा
Continues below advertisement
मागील चार दिवसांपासून नाशिकमध्ये पावसाचा जोर कायम आहे. आज पहाटेपासून देखील पावसाची संततधार सुरूच आहे. नाशिकमध्ये आज सकाळी ६५६ मिमी पावसाची नोंद करण्यात आली. शहरात ६६ मिमी पाऊस झालाय तर जिल्ह्यात ईगतपुरीमध्ये सर्वाधिक १४५ मिमी पावसाची नोंद करण्यात आलीय. धरणक्षेत्रात देखील पावसाची बॅटिंग सुरूच आहे. यामुळे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणाच्या पाणीसाठ्यात देखील मोठी वाढ झालीय, धरण ७८ टक्के भरल्यानं काल सकाळपासूनच टप्प्याटप्प्यानं गोदावरी नदीपात्रात पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. त्यामुळे गोदामाईला पूर आलाय.. आज सकाळी ६ वाजता गंगापूर धरणातून ९३०२ क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आलाय.
Continues below advertisement