नाशिक : पालघरमध्ये शिवसेनेने शब्द पाळला नाही : गिरीश महाजन

Continues below advertisement
नाशिक विधान परिषदेसाठी भाजपने राष्ट्रवादीला पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे इथे राष्ट्रवादीचे उमेदवार शिवाजी सहाणे  यांच्या विजयाचा मार्ग सुकर झाल्याचं बोललं जात आहे. नाशिकमध्ये भाजपकडे 167 मतं आहेत. शिवसेनेविरोधात पालघर पोटनिवडणुकीचा वचपा काढण्यासाठी भाजपने ही खेळी केल्याचं बोललं जातं आहे. दरम्यान पालघरमध्ये शिवसेनेने शब्द पाळला नाही, त्यामुळे सद्सदविवेकबुद्धीला पटेल त्यालाच मतदान करण्याचा सल्ला मतदारांना दिल्याचं जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी सांगितलं. 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram