नाशिक : नाशिक जिल्ह्यात गॅस्ट्रोची साथ, पाच जणांचा मृत्यू
Continues below advertisement
पावसाळा सुरु होताच नाशिकच्या ग्रामीण भागात गॅस्ट्रोची साथ आली आहे. सुरगाणा तालुक्यात चार, तर कळवणमध्ये एक, असे पाच बळी अवघ्या तीन दिवसात गेले आहेत. शिवाय शेकडो जणांना लागण झाली आहे. ही आकडेवारी प्रशासनाच्या मान्सून पूर्व कामांचे दावे फोल ठरवणारी आहे. एखाद्या गावाची शोकांतिका काय असते, प्रशासकीय अनास्था काय असते हे जर बघायचं असेल तर सुरगाणा तालुक्यातील राहुडे गावाला भेट द्यायला पाहिजे. आज या गावात स्मशान शांतता आहे, नागरिकांमध्ये संताप आहे, भावनांचा उद्रेक आहे. विद्यार्थ्यांची शाळा बंद असून शाळेचं रुग्णालयात रूपांतर करण्यात आलं आहे. कारण, या गावात तीन दिवसात चार जण दगावले आहेत. गावाला पाणी पुरवठा करणाऱ्या विहिरीत दूषित पाणी मिसळल्याने 850 लोकसंख्या असणाऱ्या गावातील 150 हून अधिक जणांना गॅस्ट्रोची लागण झाली.
Continues below advertisement