नाशिकमध्ये गणेशोत्सवापूर्वीच वादाचा 'श्रीगणेशा'
नाशिक शहरात सार्वजनिक गणेशोत्सवाची चाहूल लागताच वादाला तोंड फुटलंय. बीडी भालेकर शाळेच्या मैदानवर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे मंडप उभारण्यास मनपा प्रशासनाने विरोध केलाय. उत्सव साजरा करायला जागा न मिळाल्यास गणेशोत्सोवावर बहिष्कार टाकण्याचा इशारा मंडळांनी दिलाय.