नाशिक : 10 रुपयांचं नाणं गिळल्याने साडेचार वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू

Continues below advertisement
दहा रुपयाचं नाणं गिळल्यानं साडेचार वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना नाशिकच्या चांदगिरी गावात घडली आहे. शालिनी हांडगे असं मयत मुलीचं नावं असून उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समजते आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नाशिक जिल्ह्यातील शिंदे पळसेजवळील चांदगिरी गावात राहणाऱ्या शालिनीने  काल (रविवार) दुपारी खेळता खळता दहा रुपयाचं नाणं गिळलं होतं. त्यानंतर शालिनी झोपी गेली. मात्र, अचानक त्रास होऊ लागल्याने तात्काळ तिला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यावेळी तिने नाणं गिळल्याचं समोर आलं.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram