नाशिक : गृहपाठ केला नाही म्हणून बेदम मारहाण, एमराल्ड हाईट्स शाळेतील प्रकार
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
गृहपाठ केला नाही, वहीतलं हस्ताक्षर चांगले नाही. या शुल्लक कारणास्तव मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांना बेदम मारहाण केल्याचा प्रकार नाशिकच्या एका शाळेला चांगलाच महागात पडणार असं दिसतंय. महापालिका शिक्षण विभागाकडून या शाळेला नोटिस बजावण्यात आली आहे. शाळेची मान्यता रद्द करण्यात यावी, असा प्रस्ताव उपसंचालक विभागात पाठविण्यात आला आहे. जेलरोड भागातील एमराल्ड हाइट्स पब्लिक स्कूलच्या मुख्याध्यापिका जयश्री रोडे यांनी १४ विद्यार्थ्यांना काठीने बेदम मारहाण केली होती. दोन विद्यार्थ्यांच्या पालकांनी दिलेल्या तक्रारीवरुन रोडे यांच्या विरोधात नाशिकरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.