नाशिक : आदिवासी खेळाडूंच्या प्रबोधिनीची विदारक अवस्था, हलक्या दर्जाचं साहित्य
Continues below advertisement
आदिवासी विकास विभागाअंतर्गत राज्यातली पहिली क्रीडा प्रबोधिनी नाशकात सुरु करण्यात आली. राज्यभरातून आदिवासी समाजातील मुलं इथं आंतरराष्ट्रीय पातळीवरचे खेळाडू होण्याचं स्वप्न बाळगून दाखल झाले. मात्र इथली अवस्था फारच विदारक आहे.
आदिवासी विकास विभागाअंतर्गत राज्यातली पहिली क्रीडा प्रबोधिनी नाशिकच्या मुख्यालयाच्या ठिकाणी तात्पुरत्या स्वरुपात झाली. मात्र एकलव्य आजही उपेक्षितच असल्याचं चित्र नाशिकमध्ये पाहायला मिळत आहे.
विभागीय क्रीडा संकुलात सुरु करण्यात आलेल्या या वसतिगृहात एकाच रुममध्ये आठ-आठ मुलांना कोंबण्यात आलं आहे. त्यांना झोपायला नीट बेडही उपलब्ध नाही. दुसरीकडे जेवणाच्या नावाखाली केवळ पोळी-भाजी-वरण दिलं जातं. त्यामुळे डाएटच्या नावानंही बोंब आहे. मग अशा अवस्थेत ही मुलं मैदानावरचं प्राविण्य कसं मिळवणार? असा प्रश्न विचारला जातो आहे.