नाशिक विधानपरिषद निवडणूक: शिवसेना नेते दादा भुसे यांची प्रतिक्रिया

विधानपरिषदेच्या अमरावती आणि चंद्रपूर जागी भाजपनं गुलाल उधळला आहे.
अमरावतीत राज्यमंत्री प्रवीण पोटे यांना तब्बल 458 मतं मिळाली आहेत. तर काँग्रेसच्या अनिल माधोगढिया यांना केवळ 17 मतं मिळालीत. विशेष म्हणजे इथं काँग्रेसच्या खात्यात 128 मतं होती. म्हणजे पोटेंना काँग्रेसनं भरभरुन मतं दिल्याचं दिसतंय.
तिकडं चंद्रपुरात भाजपच्या रामदास आंबटकरांचा विजय झालाय. त्यांना एकूण 550 मतं मिळालीत. तर काँग्रेसच्या इंद्रकुमार सराफांना 462 मतं मिळालीत.
तर कोकणात राष्ट्रवादीचे अनिकेत तटकरे विजयी झालेत.
अनिकेत तटकरेंना ६२० तर राजीव साबळेंना ३०६ मतं मिळाली आहेत... तर, नाशकात शिवसेनेला आश्चर्यकारकरित्या विजय मिळालाय. कारण तिथं भाजपनं राष्ट्रवादीला पाठिंबा जाहीर करुनही नरेंद्र दराडेंनी विजय खेचून आणलाय.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola