नाशिक : क्रिप्टोकरन्सीचं लोण नाशकात, मनी ट्रेड कॉईनच्या नावाने कोट्यवधींची फसवणूक

क्रिप्टो करंन्सी प्रकरणाचं लोण ठाणे पाठोपाठ नाशिकपर्यंत येऊन पोहोचलंय. नाशिक जिल्ह्यातही शेकडो गुंतवणूकदारांची कोट्यवधींची फसवणूक झाल्याचं समोर आलंय. परदेशात पळून गेलेला मुख्य आरोपी अमित लखनपाल याने ठाण्यात एका इमारतीत कॉर्पोरेट ऑफिस उभारलं होतं. सहा महिन्यांत 15 ते 20 पट पैशांचं आमिष दाखवत त्याने अनेकाकांकडून कोट्यवधी रुपये जमा केलं. एजंटचं माध्यमातून त्याने जाळ विणत एक एक सावज टिपलं..मात्र कालांतरानं  फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यानंतर गुंतवणूकदरांनी पोलिसात धाव घेतल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. नाशिकच्या गुंतवणूकदारांची 25 ते 30 कोटी रुपयांची फसवणूक झाल्याची माहिती समोर आली असून आकडा वाढण्याची शक्यता आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola