स्पेशल रिपोर्ट : पितरांच्या मोक्षासाठी नाशिकमध्ये कावळ्याचा बाजार
Continues below advertisement
सध्या पितृपक्ष सुरु असल्यामुळे सगळ्यांनाच पितरांची आठवण झाली आहे. या जगाचा निरोप घेतलेल्या पितरांना मोक्ष मिळावा म्हणून सगळेच कावळ्यांचा धावा करत आहेत. कारण कावळा शिवल्याशिवाय पितरांना मोक्ष मिळत नाही अशी लोकांची भावना आहे. दरम्यान याच भावनेचं भांडवल करत नाशिकमध्ये एका अवलियानं जखमी कावळ्याचा बाजार मांडला आहे.
Continues below advertisement