नाशिक : कर थकवल्यामुळे काँग्रेस कार्यालयाला लिलावाची नोटीस
Continues below advertisement
नाशिकमधील कार्यालयाचा जाहीर लिलाव टाळण्यासाठी काँग्रेस पदाधिकाऱ्यांवर वर्गणीतून पैसे गोळा करण्याची वेळ आली आहे. शहर जिल्हा काँग्रेस कमिटीने नाशिक महानगरपालिकेची 26 लाख 63 हजार रुपयांची घरपट्टी थकविली आहे. वारंवार सूचना देऊनही मालमत्ता कर जमा न केल्याने महापालिकेने कॉग्रेस कमिटीसह शहरातील 394 आस्थपनाना 21 दिवसात थकबाकी भरली नाही तर मालमत्तेचा लिलाव करण्याचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे बड्या थकबाकीदारांचे धाबे दणाणले आहेत, त्यातच काँग्रेसच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी प्रदेश पातळीवर याबाबत माहिती दिली होती. मात्र वरीष्ठ पदाधिकारीकडून कान टोचण्यात एवढी मोठी रक्कम आणायची कुठून असा प्रश्न स्थानिक पदाधिकाऱ्यांना पडलाय. त्यामुळे वर्गणी काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
Continues below advertisement