नाशिक : चित्ता, चेतक, ध्रुव लढाऊ हेलिकॉप्टर्सची साहसी प्रात्यक्षिकं

नाशिकमधील गांधीनगरच्या तळावर लष्करी थाटात कॉम्बॅट आर्मी एव्हिएशन ट्रेनिंग स्कूल आणि विंग प्रदान सोहळा लष्करी थाटात पार पडला...  यावेळी प्रशिक्षणार्थ्यांचं तालबद्ध संचलन पाहायला मिळालं.. त्यानंतर युद्धजन्य परिस्थितीचा थरार अनुभवायला मिळाला... चित्ता, चेतक, ध्रुव हेलिकॉप्टर च्या सह्यायाने वैमानिकांनी श्वास रोखून धरणारी प्रात्यक्षिकं सादर केली...
य़ावेळी 28 आणि 29 व्य़ा तुकडीच्या प्रशिक्षित 47 प्रशिक्षणार्थ्यांचा गौरव सोहळा झाला... आर्मी एव्हिएशनचे डायरेक्टर जनरल कवल कुमार यांच्या हस्ते उल्लेखनीय प्रशिक्षणार्थींना पारितोषिक देण्यात आले... कॅप्टन अभिषेक सिंग आणि मेजर राज सिंग यांना मानाची सिल्व्हर चिता ट्रॉफी प्रदान करण्यात आली..

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola