स्पेशल रिपोर्ट : नाशिक : व्हेंटिलेटरमध्ये झुरळ अडकलं, श्वास न घेता आल्याने महिलेचा मृत्यू?
Continues below advertisement
व्हेंटिलेटरमध्ये झुरळ अडकल्यामुळे रुग्णाचा मृत्यू झाला, असा आरोप नातेवाईकांनी केला आहे. नाशिकच्या आडगाव परिसरातील मराठा विद्या प्रसारक समाज रुग्णालयातील हा प्रकार आहे. उपचार घेणाऱ्या अंजली बैरागी या 42 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. कृत्रिम श्वास नलिकेमध्ये झुरळ अडकल्याने त्यांना श्वास घेता आला नाही आणि यामुळेच मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप या महिलेच्या नातेवाईकांनी केला.
Continues below advertisement