नाशिक : भुजबळांमागे ससेमिरा सुरुच, बँकेची 'आर्मस्ट्राँग'ला जप्तीची नोटीस
माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ आणि माजी खासदार समीर भुजबळ यांच्या मालमत्तांवर टाच येण्याचा ससेमिरा आद्यपही कायम आहे.
नाशिक मर्चंट बँकेने आर्मस्ट्राँग इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीला जप्तीची नोटीस पाठवली असल्यानं, पुन्हा एकदा भुजबळ यांच्या मालमत्तेचा मुद्दा चर्चेत आला आहे.
नामको बँकेकडून आर्मस्ट्राँग इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीने 4 कोटी 34 लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. ते विहित मुदतीत न फेडल्याने, बँकेने नोटीस पाठवूनही 60 दिवसात कर्जफेड केली नसल्याने कारवाई करण्यात आली.
यापुढेही कंपनीने कर्जभरण्यास चालढकल केली, तर पुढची कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.