CCTV | बिबट्याला पळवल्याचा कुत्र्याचा व्हीडिओ व्हायरल | ABP Majha
कुत्र्यानं बिबट्याला पळवून लावल्याचा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेला प्रकार सोशल मीडियावर व्हायरल होतोय. त्यात हा व्हीडिओ नाशिकचाच असल्याचं समोर आलंय. देवळाली कॅम्प रोडवरील पंचदीप रेणुका माता सोसायटीतील बांधकाम व्यावसायिक दीपक बालकवडे यांच्या बंगल्याच्या आवारातील हा व्हीडिओ आहे. 29 सप्टेंबरला शनिवारी रात्री पावणेतीनच्या सुमारास कुत्र्याची शिकार करण्यासाठी बिबट्या बलकवडेंच्या बंगल्यात शिरला,,., पायरीवर झोपलेल्या कुत्र्यावर हल्ल्याच्या तयारीत असतानाच कुत्र्याला जाग आली आणि त्यानं तिथून पळ काढला. बिबट्यानं त्याचा पाठलाग करुनही तो कुत्रा बिबट्याच्या हाती लागला नाही,