नाशिक : भरवस्तीत घरफोडी, बिल्डरचा फ्लॅट फोडून 19 लाखांची चोरी
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
नाशिक शहरात वाहन चोरी आणि घरफोडीचे सत्र काही केल्या थांबायचं नाव घेत नाहीये.. शहरातील महात्मानगर या उच्चभ्रू वसाहतीत राहणाऱ्या एका बिल्डरच्या घरात भरदिवसा 19 लाख रुपयांची चोरी झालीय.. अर्चित निकेतन या अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या दर्शन रुमाले यांच्या घरात ही चोरी झालीय.. दर्शन यांच्या पत्नी काहीदिवसांपासून बाहेर गावी गेल्या आहेत.. रविवारी दुपारी दर्शन रुमाले कामानिमित्त घरातून बाहेर पडले... घरी कोणी नसल्याचा फायदा घेत चोरट्यांनी 3 तासांत घरचा मुख्य दरवाचा तोडून कपाटात ठेवलेली रोख रक्कम आणि दागिने असा 19 लाखांचा ऐवज लांबवला... याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आलीय...