नाशिक : रिक्षाचालकांच्या टोळक्याची बांधकाम व्यावसायिकाला मारहाण

नाशिकमध्ये रिक्षाचालकांच्या टोळक्यानं एका बांधकाम व्यावसायिकाला बेदम मारहाण केलीय . या घटनेत सचिन गणोरे हे जखमी झालेत. याप्रकरणी रिक्षाचालक प्रल्हाद बनसोडेला गंगापूर पोलिसांनी अटक केली आहे. कारला उलट दिशेनं येऊन कट का मारला याची विचारणा गणोरे यांनी रिक्षाचालकाला केली. याचाच राग मनात धरुन रिक्षाचालकांच्या टोळक्यानं त्यांच्यावर दगडानं हल्ला केला. काल रात्री साडेनऊच्या सुमारास कॉलेज रोडवर ही घटना घडली. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola