नाशिक : आमदार सीमा हिरेंचा भाकरी बनवण्याचा व्हिडीओ व्हायरल
नाशिकच्या आमदार सिमा हिरे यांचा भाकरी बनवतानाचा व्हीडिओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतोय. सिडको परिसरातल्या गणेश चौकात गजानन महाराजांच्या पालखी निमीत्त महाप्रसादाचं आयोजन करण्यात येतं. यावेळी हजारो भाविक उपस्थित असतात. यावेळी बाजुच्याच मैदानात चुली मांडून महिला बाजरीच्या भाकरी बनवतात. पण यंदा भाविक मोठ्या प्रमाणात आले आणि भाकरी बनवणाऱ्या महिलांची संख्या मात्र कमी पडू लागली. हे लक्षात येता भाजप आमदार सिमा हिरे यांनी थेट भाकरी थापण्यास सुरुवात केली.