नाशिक : माजी नगरसेवक कन्हय्या साळवेंच्या घरावर हल्ला, गाड्यांची तोडफोड
Continues below advertisement
नाशिकमधील माजी नगरसेवक आणि भाजप कार्यकर्ता कन्हैया साळवे यांच्या घरावर काल रात्री टोळक्यानं हल्ला केला. 20 ते 25 जणांच्या टोळक्यानं रात्री हल्ला केलाय. यावेळी कन्हैया साळवे यांच्या घराबाहेरील गाड्यांची तोडफोड केली आहे. या हल्ल्यात एक जण जखमी झाला आहे. जुन्या भांडणाची कुरापत काढून हल्ला केल्याची माहिती आहे. या संदर्भात उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी 3 ते 4 जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे.
Continues below advertisement