नाशिक: ATM मध्ये हवाहवासा बिघाड, रक्कम टाकल्यानंतर पाच पट पैसे बाहेर

एटीएममध्ये पैसे नसणं किंवा एटीएममध्ये एखाद्या बिघाडानं पैसे न मिळणं असे प्रकार आपण अनेकदा अनुभवले आहेत. मात्र नाशिकमध्ये एका ATM मध्ये प्रत्येकाला हवाहवासा वाटणारा बिघाड झाला. जर एटीएममध्ये तुम्ही पैसे काढण्यासाठी ठराविक रकमेचा आकडा टाकला आणि एटीएममधून जर त्याच्या पाच पट पैसे आले तर?

नाशिकमधील अॅक्सिस बँकेच्या एटीएममध्ये हा प्रत्येकाला हवाहवासा वाटणारा बिघाड झाला. या ATM मधून जर पैसे काढण्यासाठी ठराविक रक्कम टाकली, तर चक्क त्या रक्कमेच्या 5 पट पैसे एटीएममधून निघत होते.

नाशिकच्या विजयनगर भागातल्या अॅक्सिस बँकेच्या एटीएममध्ये हा प्रकार घडला. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola