नाशिक : बेपत्ता सहाय्यक अभियंते रविंद्र पाटील यांचा अजूनही पत्ता नाही
Continues below advertisement
गेल्या तीन दिवसांपासून बेपत्ता असलेले नाशिक महापालिकेचे सहाय्यक अभियंता रविंद्र पाटील यांचा अद्यापही ठावठिकाणा लागला नाहीय. रविंद्र पाटील शनिवारी सकाळी वॉक विथ कमिशनर कार्यक्रमासाठी जात असल्याचं सांगून घरातून बाहेर पडलेत. कामाच्या अतिताणामुळे जीवन संपवीत असल्याची चिट्ठी लिहून ते बेपत्ता झालेत. त्यांच्या शोधासाठी पोलिसांची तीन पथके तैनात करण्यात आली आहेत. मात्र रविंद्र पाटील यांचा काहीच तपास लागत नसल्याने त्यांचं कुटुंबीय आणि महापालिकेचे अधिकारी चिंतेत आहेत.
Continues below advertisement