नाशिक : गॅस सिलेंडरची नळी तोंडात धरुन उद्योजकाच्या मुलाची आत्महत्या

Continues below advertisement
गॅस सिलेंडरची नळी तोंडात धरुन उद्योजक उदय खरोटे यांचा मुलगा अजिंक्य याने आत्महत्या केली. शुक्रवारी रात्री गंगापूर रोडवरील दादोजी कोंडदेव नगरमध्ये ही घटना घडली. अजिंक्य खरोटे हा 25 वर्षांचा होता.

अजिंक्य रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास घरात एकटाच होता. त्यावेळी त्याने एलपीजी गॅस सिलेंडरचं रेग्युलेटर सुरु केले आणि गॅसची नळी तोंडात धरुन आपली जीवनयात्रा संपवली.

काही वेळाने आई-वडील घरी परतले, त्यावेळी अजिंक्यने आत्महत्या केल्याचे आढळून आले. आई-वडिलांनी त्याला तात्काळ हॉस्पिटलमध्ये नेले. हॉस्पिटलमध्ये नेताच डॉक्टरांनी अजिंक्यला मृत घोषित केले.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola