नाशिक : व्हेंटिलेटरमध्ये झुरळ सापडल्याने खळबळ, महिलेचा मृत्यू
Continues below advertisement
नाशिकमध्ये व्हेंटिलेटरमध्ये जिवंत झुरळ सापडल्यानं खळबळ माजली. नाशिकच्या आडगाव परिसरातील मराठा विद्या प्रसारक समाज रुग्णालयात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. तर व्हेंटिलेटरवर असलेल्या अंजली बैरागी या महिला रुग्णाचा मृत्यू झाला. कृत्रिम श्वासनलिकेमध्ये झुरळ अडकल्यानं तिला श्वास घेता आला नाही आणि त्यामुळेच अंजलीचा मृत्यू झाल्याचा आरोप मृत महिलेच्या नातेवाईकांनी केला.
Continues below advertisement