नाशिक : रामकुंडाजवळची 9 दुकानं जळून खाक, शेकोटीमुळे आग लागल्याचा अंदाज

Continues below advertisement
नाशिकच्या रामकुंडजवळ असलेल्या नारोशंकर मंदिर परिसरातील ९ दुकानं आगीत जळून खाक झाली आहेत. पहाटेच्या सुमारास ही आग लागली होती. यात खेळणी तसंच पुजेच्या साहित्याची दुकानं जळून मोठं नुकसान झालं आहे. पंचवटी अग्निशमन दलाच्या जवानांनी वेळीच धाव घेत ही आग आटोक्यात आणली. आगीचं नेमकं कारण अद्याप समोर आलं नसलं तरी शेकोटीमुळे ही आग लागल्याची शक्यता पोलिसांकडून वर्तवली जात आहे..तर काही समाजकंटकांनी ही आग लावल्याचा आरोप स्थानिकांकडून होतोय..सध्या पोलीस या घटनेचा तपास करत आहेत...
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram