नाशिक: साखरेच्या पाकात पडून तीन वर्षीय चिमुकलीचा मृत्यू

Continues below advertisement
गुलाबजामसाठी बनविलेल्या सखेरच्या पाकात पडून तीन वर्षीय चिमुरडीचा मृत्यू झालाय. नाशिकमध्ये ही धक्कादायक घटना घडलीय. स्वरा शिरोडे असं या मुलीचं नाव आहे. नाशिकच्या हिरावडी परिसरात राहणाऱ्या शिरोडे कुटूंबियांचा केटरिंगचा व्यवसाय आहे, रविवारी त्यांना गुलाबजाम बनविण्याची ऑर्डर मिळाली होती, त्यासाठी मोठ्या पातेल्यात साखरेचा पाक बनवायला ठेवला होता. स्वरा खेळता खेळता पातेल्या जवळ आली आणि त्यात पडली, तिला उपचारासाठी सद्गुगुरु या खाजगी रुग्णलयात दाखल करण्यात आलं होतं, मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला, 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram