नाशिक : खेळता खेळता साखरेच्या पाकात पडून 3 वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू
Continues below advertisement
गुलाबजामसाठी बनवलेल्या साखेरच्या पाकात पडून तीन वर्षीय चिमुरडीचा मृत्यू झाला. नाशिकमध्ये ही धक्कादायक घटना घडली. स्वरा शिरोडे असं या दुर्दैवी मुलीचं नाव आहे.
नाशिकमधील हिरावडी परिसरात राहणाऱ्या शिरोडे कुटुंबीयांचा केटरिंगचा व्यवसाय आहे.
रविवारी त्यांना गुलाबजाम बनविण्याची ऑर्डर मिळाली होती. त्यासाठी मोठ्या पातेल्यात साखरेचा पाक बनवायला ठेवला होता.
त्यावेळी स्वरा खेळता खेळता पातेल्याजवळ आली आणि त्यात पडली. तिला उपचारासाठी खासगी रुग्णलयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.
दरम्यान, उपचारात हलगर्जीपणा झाल्याचा आरोप शिरोडे कुटुंबीयांनी केला असून, संतप्त नातेवाईकांनी रुग्णालयाची तोडफोड केली. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.